संजय भल्ला नौदलाचे नवे सीओपी
हिंदुस्थानी नौदलाचे व्हाईस ऍडमिरल संजय भल्ला यांची नवे चीफ ऑफ पर्सनल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संजय भल्ला हे गेल्या 35 वर्षांपासून नौदलात कार्यरत आहेत. भल्ला यांनी शुक्रवारी कार्मिक प्रमुखपदाचा म्हणजेच चीफ ऑफ पर्सनल पदाचा कार्यभार स्वीकारला. भल्ला यांना त्यांच्या सेवेसाठी नौदल स्टाफप्रमुख आणि फ्लॅग
ऑफिसर कमांडिंग-इन-चीफकडून अतिविशिष्ट सेवा पदकसह अन्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संजय भल्ला हे 1 जानेवारी 1989 पासून नौदलात कार्यरत आहेत. त्यांनी विविध पदांवर काम केले असून त्यांना 35 वर्षांचा अनुभव आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List