विदर्भात अनुभवा शून्य सावली दिवस

विदर्भात अनुभवा शून्य सावली दिवस

 

विदर्भातील विविध जिह्यांमध्ये 15 ते 28 मे  दरम्यान शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. सदैव साथ देणारी आपली सावली काही क्षणांसाठी आपली साथ सोडणार आहे.  कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणाऱया सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येते. उत्तरायण आणि दक्षिणायन होताना ही स्थिती राहते.  सूर्य दररोज 0.50ओ सरकतो. सूर्य क्रांती पृथ्वीवरील स्थळाशी समान कोन करते, तेव्हा सूर्य माध्यान्हाचे वेळी नेमका डोक्यावर आल्याने आपली सावली काही क्षणासाठी नाहीशी होते. उन्हाळ्यातील या शून्य सावली दिवसाला अधिक महत्त्व आहे, असे खगोल निरीक्षक प्रभाकर दोड यांनी सांगितले.

असे राहतील शून्य सावली दिवस

15 मे सिरोंचा, 17 अहेरी, आलापल्ली, 18 मूलचेरा, आष्टी, 19 पुसद, बल्लारशा, चार्मोशी, 20 वाशीम, चंद्रपूर, मेहकर, वणी आणि दिग्रस, 21 चिखली, गडचिरोली, सिंदेवाही, 22 बुलढाणा, यवतमाळ, आरमोरी, वरोरा, 23 अकोला, खामगाव, बाळापूर, मूर्तिजापूर, ब्रम्हपुरी, 24 वर्धा, शेगाव, उमरेड, दर्यापूर, 26 नागपूर, भंडारा, परतवाडा, कामठी, 27 गोंदिया, तूमसर, रामटेक, चिखलदरा आणि 28 मे रोजी वरुड, नरखेड परिसरात हा दिवस अनुभवता येईल.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;