उद्धव ठाकरे पालघरमधील शिवसैनिकांशी साधणार आज संवाद
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी पालघरच्या दौऱयावर असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक व पदाधिकाऱयांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बैठका होणार असून उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
उद्धव ठाकरे यांचे सकाळी 10.30 वाजता पालघरच्या कोळगाव पोलीस ग्राऊंड हेलिपॅडवर आगमन होणार आहे. तेथून ते कारने जलदेवी रिसॉर्ट येथे जाणार असून शिवसैनिकांसोबत बैठका घेणार आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना इंडिया आघाडीच्या वतीने भारती कामडी निवडणूक लढवत आहेत. प्रचारासंदर्भात उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List