भारती कामडींच्या प्रचारात; काँग्रेस, माकप, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांची एकजूट

भारती कामडींच्या प्रचारात; काँग्रेस, माकप, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांची एकजूट

शिवसेना इंडिया आघाडीच्या पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भारती कामडी यांचा जोरात प्रचार सुरू असून ठिकठिकाणी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचारयात्रा, घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी, चौकसभा या माध्यमांतून हा प्रचार सुरू असतानाच काँग्रेस, माकप तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह विविध मित्रपक्षांची भक्कम एकजूट दिसून आली आहे. त्यामुळे भारती कामडी यांचे पारडे जड झाले असून कोणत्याही परिस्थितीत त्यांना विजयी करणारच, असा निर्धार करण्यात आला आहे.

पालघर लोकसभेअंतर्गत बोईसर, डहाणू, विक्रमगड, नालासोपारा, वसई व पालघर असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्व ठिकाणी कामडी यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. ‘अब की बार.. भाजप तडीपार’ असा दृढनिश्चय करीत काँग्रेस, माकप, राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र आले आहेत. त्याशिवाय विविध मित्रपक्षांनीदेखील भक्कम साथ दिल्याने भाजप व मिंध्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. डहाणूमधील माकपचे आमदार विनोद निकोले व विक्रमगडमधील राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा हे या निवडणुकीत आम्हालाच मदत करतील असे विरोधकांकडून जाणीवपूर्वक पसरवले जात आहे.

विरोधकांनी मतदारांमध्ये कितीही संभ्रम निर्माण करून अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्यक्षात मात्र निकोले व भुसारा हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार भारती कामडी यांच्या पाठीशी ठाम उभे असून प्रचारातही ते सहभागी झाले आहेत. स्थानिक शिवसैनिकांनी तर अफवा पसरवणाऱ्यांची हवा काढून टाकली आहे. केवळ पालघरच नव्हे तर राज्य व देशामध्ये राजकीय परिवर्तन घडवण्यासाठीच इंडिया आघाडीतील घटक पक्ष एकत्र आले असल्याचे स्पष्टपणे सांगितले जात आहे. एकमेकांचे विचार काहीसे वेगळे असले तरी विरोधकांचा पाडाव करण्यासाठी शिवसेनेसह काँग्रेस, माकप, राष्ट्रवादी व अन्य मित्रपक्ष यांची भक्कम एकजूट असल्याचे दिसून येत आहे. याचा फायदा भारती कामडी यांना निश्चित होईल, असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.

नोएल डाबरे यांचा भारती कामडी यांना पाठिंबा

बार असोसिएशनचे अध्यक्ष व मार्कुस डाबरे यांचे बंधू नोएल डाबरे यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी खुले पत्रकही काढले असून कामडी यांना विजयी करावे असे आवाहन केले आहे.

खोडसाळ बातम्यांवर विश्वास ठेवू नका – मार्कुस डाबरे

वसईतील ज्येष्ठ कामगार नेते व विचारवंत मार्कुस डाबरे यांनी स्थानिक पक्षाला पाठिंबा दिला असल्याचे खोडसाळ वृत्त प्रसिद्ध झाले होते, पण अशा बातम्यांवर मतदारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन डाबरे यांनी केले आहे. या प्रकारच्या बातम्यांमुळे ख्रिस्ती, मुस्लीम व मराठी समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;