राज्याला अवकाळी पावसाने झोडपले
छत्रपती संभाजीनगरसह सांगली, नगरसह राज्यातील अनेक जिह्यांना अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. शेतकऱयांना मोठा फटका बसला असून भाजीपाला, आंबा आणि इतर फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले. नागपूरमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानंतर आज अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
पुढील 48 तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाटय़ाच्या वाऱयासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, गुरुवारी नागपूर जिह्यात कोसळधार पाऊस पडला. काही दिवसांपूर्वी हवामान विभागाने नागपूर जिह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला होता. 15 मेपर्यंत अनेक जिह्यांत जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List