जूनपासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; मुंबई विद्यापीठाने जारी केले आदेश
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या (एनईपी) पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमांसाठी अंतर्गत आणि बाह्य मूल्यांकन पद्धत सुरू होणार आहे. यानुसार 40-60 गुणांकन पॅटर्न निश्चित करण्यात आला असून याची अंमलबजावणी जूनपासून केली जाणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत 894 हून अधिक महाविद्यालयात या नव्या पॅटर्नची अंमलबजावणी केली जाणार आहे. या अंमलबजावणीसाठी विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना आदेश जारी केले असल्याची माहिती विद्यापीठाचे पुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी दिली. पदवी अभ्यासक्रमाच्या या नव्या पॅटर्नमुळे आत्तापर्यंत सुमारे 100 गुणांची परीक्षा आणि त्यावर आधारीत मूल्यांकन होत असलेल्या कला, वाणिज्य पदवी अभ्यासक्रमांमध्ये या नव्या पॅटर्ननुसार बदल होतील. शिवाय या पदवीच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या उद्योग, व्यवसाय आदी क्षेत्रांतील असाईनमेंट, विषयाशी संबंधित कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव, ऑनजॉब ट्रेनिंग आदींचा यात समावेश असणार आहे.
जूनपासून लागू केल्या जाणाऱया पदवी अभ्यासक्रमासाठी प्रत्येक सेमिस्टर परीक्षेसाठी 60 गुण निश्चित करण्यात आले आहेत. 40 गुण हे सातत्यपूर्ण मूल्यमापनासाठी असतील. यात परीक्षा, प्रॅक्टिकल, असानमेंट आदींचा समावेश असेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List