सीईटी परीक्षा सर्व्हर बिघाड, 252 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या सीईटी परीक्षेत तांत्रिक गोंधळ झाला आहे. शुक्रवारी सकाळी याचा फटका बोरिवलीतील तब्बल 252 विद्यार्थ्यांना बसला. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता पुन्हा होणार असून येत्या 15 किंवा 16 मे रोजी परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे.
अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, पृषी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या आणि विद्यार्थी संख्या अधिक असलेली एमएचटी सीईटी परीक्षेतील पीसीएम ग्रुपची परीक्षा सुरू आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात परीक्षा देण्यासाठी बोरिवली येथील एल एन महाविद्यालयातील परीक्षा पेंद्रावर विद्यार्थी पोहोचले. मात्र या परीक्षेसाठी तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा सुरुच झाली नाही. ही परीक्षा 17 मे पर्यंत राज्यभरातील विविध सत्रात होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List