हिंदुस्थानी संघाच्या गुरूचा शोध सुरू

हिंदुस्थानी संघाच्या गुरूचा शोध सुरू

गेल्या वर्षी जी चूक घडली ती पुन्हा घडणार नाही. 2027 मध्ये होणाऱया वन डे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी हिंदुस्थानी संघाच्या नव्या गुरूचा म्हणजेच मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. टी-20 वर्ल्ड कपपूर्वी नव्या गुरूसाठी अर्ज मागवले जाणार असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली.

वन डे वर्ल्ड कपनंतर राहुल द्रविडचा कार्यकाल संपला होता. पण नव्या प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी आमच्याकडे पुरेसा वेळ नसल्यामुळे आम्ही विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांना टी-20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र आता नव्या प्रशिक्षकासाठी आम्ही आताच अर्ज मागवणार आहोत आणि त्या प्रशिक्षकाच्या नावावर टी-20 वर्ल्ड कप संपण्याआधीच शिक्कामोर्तब होईल.

टी-20 वर्ल्ड कपपूर्वी प्रशिक्षकपदाचे अर्ज मागवणार, द्रविडही अर्ज करू शकतो

राहुल द्रविड यांचा कार्यकाल जूनअखेरीस संपत आहे, पण त्यांची इच्छा असेल तर ते पुन्हा प्रशिक्षकपदासाठी अर्ज करू शकतात. नवे निवडला जाणारा प्रशिक्षक 2027 च्या वन डे वर्ल्ड कपपर्यंत हिंदुस्थानी संघाचा प्रशिक्षक असेल. अन्य स्टाफची आणि सहाय्यक प्रशिक्षकांची निवड मुख्य प्रशिक्षकाशी सल्लामसलत केल्यानंतर केली जाईल. तसेच हिंदुस्थानच्या तिन्ही फॉरमॅटसाठी एकच प्रशिक्षक असेल. त्यामुळे तिन्ही फॉरमॅटसाठी तीन प्रशिक्षकाची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. संघाच्या बाबतीत काही निर्णय घ्यायचे असतील तर आम्ही क्रिकेट सल्लागार समितीशी चर्चा करून घेऊ. ते जे निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करण्याचे माझे काम असेल. तसेच निवड समितीत सलील अंकोला यांच्या जागी उत्तर विभागातील एका नव्या सदस्याची वर्णी लवकरच लागेल, असेही त्यांनी संकेत दिले.

आधी वर्ल्ड कप मग विश्रांती

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर आली आहे. त्यामुळे काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण ही शक्यता जय शाह यांनी फेटाळली. जे संघ आयपीएलमधून बाद झाले आहेत. त्या संघातून हिंदुस्थानी संघात निवड झालेले खेळाडू पहिल्या तुकडीबरोबर मिशन टी-20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला रवाना होतील आणि उर्वरित खेळाडू हे आयपीएल संपताच निघतील, अशी माहिती जय शाह यांनी दिली. त्यामुळे रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंडय़ा आणि सूर्यकुमार यादव या मुंबई इंडियन्सच्या एकाही खेळाडूला विश्रांती मिळणार नाही. हे खेळाडू आणि आयपीएलमधून बाद झालेल्या संघातील खेळाडू आपल्या हिंदुस्थानी संघाच्या सपोर्टिंग स्टाफसह अमेरिकेत जाऊन स्पर्धेची तयारी करतील. म्हणजेच हिंदुस्थानी संघ दोन तुकडय़ांमध्ये अमेरिका गाठणार असल्याचेही शाह यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;