मतदानाच्या टक्केवारीत साडेपाच टक्क्यांची वाढ होतेच कशी? इंडिया आघाडीने धरले निवडणूक आयोगाला धारेवर

मतदानाच्या टक्केवारीत साडेपाच टक्क्यांची वाढ होतेच कशी? इंडिया आघाडीने धरले निवडणूक आयोगाला धारेवर

मतदानाच्या टक्केवारीत साडेपाच टक्के वाढ होतेच कशी आणि ही टक्केवारी जाहीर करायला इतके दिवस लागण्याचे कारण काय, अशा प्रश्नांचा मारा करत आज इंडिया आघाडीच्या शिष्ठमंडळाने पत्राद्वारे निवडणूक आयोगाला धारेवर धरले.

काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते महुआ माजी, द्रमुकचे नेते टी. आर. बालू आणि इंडिया आघाडीतील इतर नेत्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

मतदान आकडेवारीबद्दल सुनावले

– प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आणि संबंधित विधानसभा मतदारसंघात मिळालेली मते अशा महत्त्वाच्या आकडेवारीचा आयोगाने अद्याप उल्लेख केलेला नाही, असे या पत्रात म्हटले आहे.

– वास्तविक मतदानाच्या या तपशिलाबाबत उपस्थित केलेल्या या शंका दूर करण्यासाठी, आयोगाने केवळ लोकसभा आणि विधानसभा क्षेत्रनिहायच आकडेवारी नव्हे तर प्रत्येक मतदान पेंद्रावरील मतदानाची आकडेवारीही जारी करायला हवी होती, असे शिष्टमंडळाने या निवेदनात म्हटले आहे.

निवडणूक आयोगाच्या उलटय़ा बोंबा

मतदानाच्या आकडेवारीतील तफावतीबद्दल इंडिया आघाडीचे नेते आज भेटणार आहेत असे म्हटल्यावर आयोगाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या पत्राची आठवण झाली. लगोलग शिष्टमंडळ भेटण्याच्या एक तास अगोदर आयोगाकडून या पत्राला उत्तर देण्यात आले. आकडेवारी देण्यात पुठलाही विलंब झालेला नाही. उलट तुमचे आरोप म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेवर हल्ला करण्याचा प्रयत्न  आहे. अशा विधानांचा मतदारांच्या सहभागावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि आयोग अशा विधानांवर कारवाई करू शकतो, अशी शिरजोरी आयोगाने या उत्तरात केली आहे.

डेमोव्रेटीक रिफॉर्म्सची सर्वोच्च न्यायालयात धाव

निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानाच्या टक्केवारीसह सर्व मतदान केंद्रांवरील मतदानाची अंतिम प्रमाणीपृत आकडेवारी मतदानानंतर  48 तासांच्या आत जाहीर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. असोसिएशन फॉर डेमोव्रेटीक रिफॉर्म्स संस्थेने हा अर्ज दाखल केला आहे. आयोगाने विलंबाने आकडेवारी जाहीर केल्यामुळे हा विलंब, वाढलेली टक्केवारी आणि भिन्न मतदारसंघ आणि मतदान केंद्रनिहाय संपूर्ण आकडेवारीच्या अनुपस्थितीमुळे या डेटाच्या अचूकतेबद्दल चिंता आणि सार्वजनिक शंका निर्माण झाल्या आहेत, असे अर्जात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;