दक्षिणेत साफ तर उत्तरेत हाफ अशी भाजपाची स्थिती होईल, काँग्रेसचा मोदी सरकारवर जोरदार हल्ला

तीन टप्प्यांतील मतदानानंतर सर्व काही स्वच्छ दिसत आहे. दक्षिणेत साफ तर उत्तरेत हाफ अशी भाजपाची स्थिती होणार आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मतदानाची आकडेवारी जनतेचा काwल इंडिया आघाडीच्या बाजूने असल्याचे सांगितले. ही निवडणूक ऐतिहासिक असून इंडिया आघाडीचेच सरकार येईल, असेही ते म्हणाले. 2004 सारखी स्थिती 2024 मध्ये असेल याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पुढच्या टप्प्यापर्यंत इंडिया आघाडी बहुमताच्या आकडय़ाजवळ पोहोचलेली असेल, असा विश्वासही जयराम रमेश यांनी व्यक्त केला. 19 एप्रिलच्या पहिल्या टप्प्यानंतरच भाजपाची दक्षिणेत साफ तर उत्तरेत हाफ अशी स्थिती होईल हे चित्र स्पष्ट झाले होते, असे ते म्हणाले. 27 एप्रिलच्या दुसऱया टप्प्यानंतर भाजपा दक्षिणेकडे पूर्णपणे साफ होईल तर उत्तर आणि मध्य हिंदुस्थानात 2019 च्या तुलनेत भाजपाचे संख्याबळ अर्धे होईल, असेही ते म्हणाले. तीन टप्प्यांतील मतदानानंतर 2004 मध्ये जी स्थिती होती तशीच स्थिती 2024 मध्ये दिसेल, असे जयराम रमेश म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;