Video भाजपच्या पोल बुथ एजंटच्या किटमध्ये सोन्याची बिस्कीटे

मुंबईतील घाटकोपर परिसरात भाजपच्या पोल बूथ एजंटना पाठवल्या जाणाऱ्या प्रचार किटमध्ये प्रत्येकी एक सोन्याचे बिस्किट असल्याचे समोर आले आहे. या प्रकाराचा व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओत पोलीस आणि दक्षता अधिकारी सोन्याची बिस्कीटे सापडल्याचे बोलत आहेत. या घटनेचा व्हिडीओ महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्या ‘X’ अकाऊंटवर शेअर केला आहे.

या पोस्टसोबत काँग्रेसने एक पोस्ट शेअर करत भाजपला फटकारले आहे. ”अदानींचा टेम्पो पोहोचला मुंबईत. भाजप निवडणुकीसाठी पैशांचा किती सर्रास वापर करतं आहे, हे या व्हिडीओतून सिद्ध होत आहे. मुंबईतील घाटकोपर परिसरात भाजपच्या पोल बूथ एजंटना पाठवल्या जाणाऱ्या प्रचार किटमध्ये प्रत्येकी एक सोन्याचे बिस्किट असल्याचे या व्हिडीओतील पोलीस आणि दक्षता अधिकारी बोलत असल्याचं ऐकू येत आहे. याच्यावर कारवाई केली जाणार की नाही?”, अशी पोस्ट काँग्रेसने शेअर केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;