शाहरुख खानचा सर्वात मोठा बोल्ड सीन, सीन हटवण्यासाठी मोजली मोठी किंमत

शाहरुख खानचा सर्वात मोठा बोल्ड सीन, सीन हटवण्यासाठी मोजली मोठी किंमत

अभिनेता शाहरुख खान याला रोमान्सचा बादशहा म्हटलं जातं. अनेक सिनेमांमध्ये प्रियकराची भूमिका साकारत किंग खान याने चाहत्यांना कपल गोल्स दिले आहेत. आज देखील अभिनेत्याने अनेक जुने सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहातात. पण एक सिनेमा असा होता ज्यामध्ये शाहरुख खान याने सर्वात मोठा बोल्ड सीन दिला होता. पण शाहरुख खान याने अशी एक शक्कल लढवली ज्यामुळे तो सीन चाहते कधीच पाहू शकत नाहीत. तर सीन पुढे जाऊन व्हायरल होऊ नये म्हणून किंग खानने काय केलं जाणून घेऊ…

सध्या शाहरुख खान याच्या ज्या सिनेमाची चर्चा तुफान रंगली आहे तो सिनेमा 1993 साली प्रदर्शित झाला होता. सिनेमाचं नाव होतं ‘माया मेमसाब…’, सिनेमात शाहरुख खान याच्यासोबत अभिनेत्री दिपा साही महत्त्वाच्या भूमिकेत होती. सिनेमात दिपा आणि शाहरुख यांच्यावर बोल्ड सीन शूट करण्यात आला होता.

‘माया मेमसाब…’ सिनेमात शाहरुख खान याने दिलेला इंटिमेट सीन अभिनेत्याचा आतापर्यंत सर्वात मोठा इंटिमेट सीन होता. सिनेमा फ्लॉप झाला. पण सीनमुळे वादग्रस्त वातावरण निर्माण झालं होतं. जेव्हा शाहरुख याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली तेव्हा अभिनेत्याने मोठा निर्णय घेतला.

शाहरुख खान याने रेड चिलिज एन्टरटेनमेंटच्या माध्यमातून सिनेमाचे सर्व राईट्स विकत घेतले. ज्यासाठी अभिनेत्याला मोठी किंमत मोजवी लागली. काही दिवसांपूर्वी दिपा शाही आलेल्या अनुभव सांगत म्हणाली, ‘सर्वात आधी तर मला फार विचित्र वाटलं. पण तुम्हाला जे गरजेचं आहे, ते करावंच लागतं.’ सध्या सर्वत्र दिपा आणि शाहरुख खान यांच्या सिनेमाची चर्चा रंगली आहे.

शाहरुख खान याचे आगामी सिनेमे…

शाहरुख खान याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘किंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात पहिल्यांदा किंग खान लेक सुहाना खान हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किंग खान याच्या आगामी सिनेमाची देखील चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, चार वर्षांच्या ब्रेकनंतर किंग खान याने ‘पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण केलं. तेव्हा अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी चित्रपटगृहात मोठी गर्दी केली. ‘पठाण’ सिनेमानंतर किंग खान ‘जवान’ आणि ‘डंकी’ सिनेमात देखील दिसला. शाहरुख खान याच्या प्रत्येक सिनेमाने फक्त भारतात नाहीतर, परदेशात देखील तगडी कमाई केली. आता चाहते किंग खान याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;