अमिताभ बच्चन यांच्या लेकीने 3 हजारांसाठी केली नोकरी, श्वेता बच्चनकडून मोठा खुलासा, म्हणाली, उधार..

अमिताभ बच्चन यांच्या लेकीने 3 हजारांसाठी केली नोकरी, श्वेता बच्चनकडून मोठा खुलासा, म्हणाली, उधार..

बाॅलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन हे आज कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट केले आहेत. अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग अमिताभ बच्चन यांची बघायला मिळते. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अमिताभ बच्चन कायमच दिसतात.

अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन ही अभिनयापासून दूर आहे. मात्र, असे असताना देखील श्वेता बच्चन ही नेहमीच चर्चेत असते. श्वेता बच्चन हिचा मुलगा अगस्त्य नंदा याने बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. काही दिवसांपूर्वीच श्वेता बच्चन आणि जया बच्चन या नव्या नवेली नंदा हिच्या शोमध्ये पोहचल्या होत्या.

श्वेता बच्चन हिने करोडपती निखिल नंदा याच्यासोबत लग्न केले. अमिताभ बच्चन यांची लेक आणि करोडपती बिझनेसमॅनची पत्नी असूनही श्वेता बच्चन हिने फक्त 3 हजार महिन्यांवर नोकरी केली. याबद्दल मोठा खुलासा करण्यात आलाय. याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. बालवाडीत सहाय्यक शिक्षिका म्हणून श्वेता बच्चन काम करत असत.

बालवाडीत सहाय्यक शिक्षिका म्हणून महिनाभर काम केले की, श्वेता बच्चन हिला 3 हजार रूपये पगार मिळत असत. श्वेता बच्चन हिने याबद्दल नव्याच्या शोमध्ये खुलासा केला. सुरूवातीच्या दिवसांबद्दल सांगताना देखील श्वेता बच्चन ही दिसली. श्वेता बच्चन हिने म्हटले की, मी अभिषेक बच्चन याच्याकडून कायमच खाण्यासाठी उधार पैसे घेत.

श्वेता म्हणाली की, मी फक्त कॉलेजमध्येच नव्हे तर शाळेतही खाण्यापिण्याची खरेदी करण्यासाठी अभिषेककडून पैसे उधार घेत असत. वडील बाॅलिवूडचे इतके मोठे स्टार असतानाही श्वेता बच्चन ही 3 हजारांसाठी काम करत असल्याचे ऐकून लोक नक्कीच हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. यावर स्वत: श्वेता बच्चन हिनेच खुलासा केलाय. श्वेताची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;