करिश्मा कपूर हिने सासऱ्यांमुळे मोडला स्वतःचा संसार, अभिनेत्री सासऱ्यांवर गंभीर आरोप करत म्हणाली…

करिश्मा कपूर हिने सासऱ्यांमुळे मोडला स्वतःचा संसार, अभिनेत्री सासऱ्यांवर गंभीर आरोप करत म्हणाली…

अभिनेत्री करिश्मा कपूर हिने आतापर्यंत अनेत सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण करिश्मा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी, तर खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये करियर करत असताना करिश्मा हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याचं अभिनेत्यासोबत करिश्मा हिचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर अभिनेत्रीने आईच्या म्हणण्यानुसार उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण दोन मुलांच्या जन्मानंतर देखील संजय – करिश्मा यांच्यातील वाद मिटले नाहीत. अखेर लग्नाच्या 13 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

घटस्फोटा दरम्यान करिश्मा आणि संजय यांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप देखील केले. लग्नानंतर पतीने लावली करिश्मा कपूर हिची बोली, सासूने केले अत्याचार, मुलांची कस्टडी… इत्यादी गोष्टी तेव्हा चाहत्यांमध्ये चर्चेत होत्या. संजय कपूर याच्याकडून झालेल्या शारीरिक आणि मानसिक छळाबद्दल देखली करिश्मा हिने मुलाखतीत सांगितलं होतं.

एक मुलाखतीत करिश्मा म्हणाली होती, ‘संजय याच्या वडिलांनी माझ्या आईला प्रचंड रडवलं होतं. तेव्हाचं मला असं वाटतं संजय याचं कुटुंब एका महिलेसोबत असं वागत असेल तर, लग्नानंतर भविष्यात काय होईल? ‘ याच कारणामुळे करिश्मा हिने लग्नासाठी नकार देखील दिला होता.

करिष्मा म्हणाली होती, ‘तेव्हा घटत असलेल्या गोष्टी मी समजावून घेतल्या नाहीत… याचं दुःख आहे. त्यानंतर संजय आणि त्याच्या कुटुंबियांनी माझी फसवणूक केली…’ सांगायचं झालं तर, करिष्मा कपूर हिचे वडील रणधीर कपूर यांनी देखील मोठ्या जावायला ‘थर्ड क्लास माणूस’ असल्याचं सांगितलं होतं.

संजय आणि करिश्मा यांच्या घटस्फोटाला अनेक वर्ष झाली आहेत. पण दोघांच्या नात्याच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. घटस्फोटानंतर करिश्मा कपूर हिने दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. तर संजय याने तिसरं लग्न केलं. करिश्मा कपूर ही संजय याची दुसरी पत्नी होती.

घटस्फोटानंतर करिश्मा हिने दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर करिश्मा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर करिश्मा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;