‘बारवी फेल’ अभिनेता विक्रांत मेस्सीचं टॅक्सीचालकासोबत भांडण; व्हिडीओ आला समोर

‘बारवी फेल’ अभिनेता विक्रांत मेस्सीचं टॅक्सीचालकासोबत भांडण; व्हिडीओ आला समोर

‘बारवी फेल’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये तो एका टॅक्सी ड्राइव्हरशी भांडताना दिसत आहे. ‘बारवी फेल’ या चित्रपटातील विक्रांतच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. केवळ ऑनस्क्रीनच नव्हे तर ऑफस्क्रीनही त्याच्या साध्या स्वभावाची प्रशंसा झाली होती. मात्र आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये विक्रांतचं वेगळंच रुप पहायला मिळतंय. या व्हिडीओमध्ये कॅब ड्राइव्हर विक्रांतवर गंभीर आरोप करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये कॅब ड्राइव्हर हा विक्रांतला त्याच्या लोकेशनवर पोहोचवल्यानंतर पैसे मागताना दिसतोय. हा व्हिडीओ स्वत: त्या ड्राइव्हरने रेकॉर्ड केला आहे. त्यात विक्रांत प्रवाशाच्या सीटवर बसलेला पहायला मिळतोय. त्याला ड्राइव्हर म्हणतो, “सर जे भाडं दिसतंय, ते द्यावंच लागेल.” यावर उत्तर देताना विक्रांत ड्राइव्हरला म्हणतो, “जेव्हा आपण निघालो तेव्हा 450 रुपये होते, आता इतकं भाडं कसं वाढलं?” हे ऐकून ड्राइव्हर पुढे म्हणतो, “म्हणजे तुम्हा भाडं देणार नाही का?” त्यावर विक्रांत म्हणतो, “का देणार भावा आणि तू ओरडतोय कशाला?”

पहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

यानंतर संबंधित कॅब ड्राइव्हर व्हिडीओ रेकॉर्ड करत म्हणतो, “माझं नाव आशिष आहे आणि मी माझ्या प्रवाशाला त्याने सांगितलेल्या जागी पोहोचवलं आहे. पण आता तो मला पैसे देण्यास नकार देतोय आणि उलट माझ्याशी भांडतोय. मला शिवीगाळही करतोय.” असं म्हणतो तो ड्राइव्हर कॅमेरा विक्रांतच्या दिशेने फिरवतो. त्यावर विक्रांत त्याला म्हणतो, “कॅमेरा का काढला? धमकी देतोय का? मी योग्य तेच बोलतोय. हे अचानक इतके पैसे कसे वाढले? असं नाही चालणार.”

त्यावर ड्राइव्हर विक्रांतला उत्तर देतो की, “का नाही चालणार सर? यात माझी काय चूक आहे? ही तर ॲपवाल्यांची मनमानी आहे. यात ॲपवाल्यांची चूक आहे. तुमच्याकडे सर इतके पैसे आहेत. तुम्ही कोट्यवधींचे मालक आहात. तुम्ही मला माझे पैसे द्या.” यावर भडकून विक्रांत म्हणतो, “जर माझ्याकडे पैसे आहेत तर ते माझ्या मेहनतीचे आहेत. ते मी असे वाया का घालवू? ही कॅब जितक्या रुपयांना मी बुक केली होती, मी तितकेच पैसे देणार.” विक्रांत आणि कॅब ड्राइव्हरच्या संभाषणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;