शरीरावर जखमा, पसरलेलं काजळ…, पूर्ण दिवस इंटीमेट सीन शूट करून अभिनेत्रीची झाली अशी अवस्था

शरीरावर जखमा, पसरलेलं काजळ…, पूर्ण दिवस इंटीमेट सीन शूट करून अभिनेत्रीची झाली अशी अवस्था

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी मोठ्या पडद्यावर इंटिमेट सीन द्यायचे नव्हते म्हणून अभिनय विश्वाला रामराम ठोकला. पण काही अभिनेत्रींनी मात्र सर्व मर्यादा पार करत सिनेमा किंवा सीरिजच्या कथेला असलेली गरज पूर्ण केली. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री श्रृती शर्मा… श्रृती हिने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ सीरिजमध्ये सायमा भूमिका पार पाडली आहे. अभिनेत्रीने साकारलेल्या भूमिकेचं देखील सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रृती हिने साकारलेल्या भूमिकेची चर्चा रंगली आहे.

‘हीरामंडी’ सीरिजमध्ये श्रृती हिने आलमझेब (शर्मिन सेगल) हिच्या नोकराणीची भूमिका साकारली आहे. सीरिजमध्ये श्रृती आणि मल्लिकाजान म्हणजे अभिनेत्री मनिषा कोईराला हिचा ड्रायव्हर इकबाल यांच्यामध्ये काही इंटिमेट सीन आहेत. इकबाल ही भूमिका साकारलेल्या अभिनेत्याचं नाव रजत कौल असं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत श्रृती हिने इंटिमेट सीन शूट करताना आलेला अनुभव चाहत्यांना सांगितला आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘सीरिजमध्ये माझ्या आणि इकबालमध्ये इंटिमेट सीन आहेत. सीन प्रचंड रोमाँटिक आहेत. स्क्रिनवर असा रोमान्स पहिल्यांदा केला आहे. आम्ही रोलिंग करत बोलत होतो. प्रचंड कठीण कोरियोग्राफी होती. मी आणि इकबाल एकमेकांच्या प्रचंड जवळ होतो…’

‘सीन प्रचंड हार्श होते. ज्यामुळे माझ्या शरीरावर जखमा झाल्या होत्या. माझ्या मते सीन पूर्ण दिवस सुरु होता. जेव्हा सीन संपला तेव्हा माझं काजळ पसरलं होतं. कारण तेथे माती होती. पण सीन खूप चांगला झाला.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
श्रृती हिने फक्त इंटिमेट सीन शूट करताना आलेला अनुभव नाही तर, संजय लीला भन्साळी यांचे आभार देखील मानले.

अभिनेत्रीला माहिती होतं की, सीरिजमध्ये तिची भूमिका फार छोटी असेल. पण एवढ्या मोठ्या सीरिजमध्ये भूमिका मिळणं देखील फार मोठी गोष्ट आहे… असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे.

श्रृती शर्मा हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘गठबंधन’, ‘नजर 2’, ‘नमक इश्क का’, ‘ये जादू है जिन का’ या मालिकांमध्ये श्रृती हिने महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. ‘हीरामंडी’ सीरिजमुळे श्रृती हिच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे.

सोशल मीडियावर देखील श्रृती कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर श्रृती हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी श्रृती कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;