होंठ लाल करवाना चाहती हैं, प्रसिद्ध अभिनेत्रीला असं का म्हणाला मुनव्वर फारुकी?

होंठ लाल करवाना चाहती हैं,  प्रसिद्ध अभिनेत्रीला असं का म्हणाला मुनव्वर फारुकी?

‘बिग बॉस 17’चा विजेता आणि प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील मुनव्वर फारुकी याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मुनव्वर फारुकी आणि प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरी यांच्यासमध्ये बोलणं सुरु आहे. सांगायचं झालं तर, नुकताच अदिती नेटफ्लिक्सवरील मुशायरा रोस्ट मध्ये सहभागी झाली होती. अदिती हिच्यासोबत ‘हीरामंडी’ सीरिजमधील अन्य अभिनेत्री देखील होत्या.

मुशायरा रोस्टमध्ये अदिती ‘बिग बॉस’ विनर मुनव्वर फारुकी याला रोस्ट करताना दिसली. अदिती हिने मुनव्वर फारुकी याला शायराना अंदाजात रोस्ट केलं. त्यानंतर मुनव्वर फारुकी याने देखील अभिनेत्रीला विनोदी अंदाजात उत्तर दिलं. सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे, अदिती सर्वात आधी मुनव्वर याला प्रेमाने बोलावते. पुढे शायरी करत अदिती म्हणते, ‘डोंगरी की शान, रिऍलिटी शो की पहचान, फिर भी इसे देखकर के मन करता है कह दूं भैय्या जी लगा दो एक पान…’ यावर ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्री हसू लागतात.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

 

यावर मुनव्वर फारुकी म्हणतो, ‘पॉझिटीव्हीटी देखो वो होंठ लाल करवाना चाहती है…’ यावर संजीदा म्हणते भौय्या जी बोलकर… सध्या सर्वत्र व्हिडीओची चर्चा रंगली आहे. व्हिडीओमध्ये मुनव्वर फारुकी आणि अदिती यांच्यासोबत अभिनेत्री मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, संजीदा शेख, शर्मिन सेगल देखील दिसत आहे.

व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. चाहत्यांना देखील अदिती आणि मुनव्वर यांचा विनोदी अंदाज आवडला आहे.

सध्या अभिनेत्री ‘हीरामंडी’ सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. 1 मे रोजी सीरिज नेटफ्लिक्स प्रदर्शित झाली आहे. सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘हीरामंडी’ सीरिजची चर्चा रंगली आहे. पण दिग्दर्शक संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ सीरिजला चाहत्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;