बिग बॉस फेम अब्दू रोजिक खरंच करतोय लग्न? शिव ठाकरे याने दिली मोठी अपडेट

बिग बॉस फेम अब्दू रोजिक खरंच करतोय लग्न? शिव ठाकरे याने दिली मोठी अपडेट

‘बिग बॉस 16’ मध्ये दिसल्यापासून गायक अब्दू रोजिक याच्या चाहत्यांच्या संख्येत फार मोठी वाढ झाली आहे. अब्दू रोजिक कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील अब्दू रोजिक एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आला आहे. अब्दू रोजिक लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. अब्दू रोजिक म्हणजे ‘छोटा भाईजान’ याच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. सोशल मीडियावर सर्वत्र अब्दू रोजिक याच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. चाहत्यांच्या आनंद देखील गगनाला भिडला आहे. आता यावर अब्दू रोजिक याचा खास मित्र शिव ठाकरे याने मोठं वक्तव्य केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दू रोजिक 7 जुलै रोजी लग्न करणार आहे. 20 वर्षीय अब्दू रोजिक 19 वर्षीय तरूणीसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अमीराती येथील अमीरा हिच्यासोबत अब्दू रोजिक लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अब्दू रोजिक याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट मला माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती भेटली आहे… असं चाहत्यांना सांगितलं होतं.

अब्दू रोजिक याच्या लग्नावर अभिनेता शिव ठाकरे याने देखील मोठं वक्तव्य केलं आहे. शिव ठाकरे म्हणाला, ‘माझं आणि अब्दू रोजिक बोलणं झालं आहे. पण तो लग्नाबद्दल काहीही बोलला नाही. अब्दू रोजिक याच्या लग्नाबद्दल जाणून मी हैराण झालो आहे. मला याबद्दल काहीही माहिती नाही. मुलगी कोण आहे, हे देखील मला माहिती नाही…’

‘मला देखील अब्दू रोजिक याच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावरुन कळलं आहे. 30 मिनिटांपूर्वीच आमचं बोलणं झालं आहे. माहीती नाही बातमी खरी आहे की खोटी…’ असं शिव ठाकरे म्हणाला. बिग बॉसमुळे अब्दू रोजिक आणि शिव ठाकरे यांची मैत्री घट्ट झाली…

अब्दू रोजिक याने शेअर केलेला व्हिडीओ

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Abduroziq Official (@abdu_rozik)

 

गुरुवारी अब्दू रोजिक याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. व्हिडीओ शेअर करत अब्दू रोजिक याने कॅप्शनमध्ये स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘मी एवढा भाग्यशाली असेल… याचा मी आयुष्यात कधीच विचार केला नव्हता. मला खास व्यक्तीकडून प्रेम मिळेल, जी माझा सन्मान करते. माझ्या आयुष्यातील अडचणींना त्रास समजत नाही. 7 जुलै सेव्ह द डेट.. मी शब्दात नाही सांगू शकत की मी किती आनंदी आहे…’ असं अब्दू रोजिक म्हणाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;