आता उरलीसुरली अब्रू वाचवण्यासाठी मुंबई उतरणार

आता उरलीसुरली अब्रू वाचवण्यासाठी मुंबई उतरणार

आयपीएलचे 54 सामने झाले, पण अद्याप एकही संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरलेला नाही. मात्र आठ पराभवांमुळे आयपीएलमधून बाद होण्याचे दुर्दैव मुंबई इंडियन्सच्या पदरी पडले आहे. त्यामुळे उर्वरित तिन्ही सामन्यात आपली उरलीसुरली अब्रू वाचवण्यासाठी मुंबई इंडियन्स वानखेडेवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध भिडणार आहे. दुसरीकडे हैदराबाद आपला सातवा विजय नोंदवून प्ले ऑफ प्रवेशासाठी आपले स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करील. गुजरात सोडून मुंबईचे नेतृत्व स्वीकारणाऱया हार्दिक पंडय़ाचा पायगुण संघाला फारच घातक ठरला आहे. वानखेडेवर झालेल्या पाचपैकी दोन सामन्यांतच मुंबई विजयी ठरली. गेल्या सामन्यात मुंबईला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. मुंबईच्या फलंदाजीसह गोलंदाजांची कामगिरीही फार उत्साहवर्धक राहिलेली नाही. रोहित शर्मा, इशान किशन यांच्या अपयशामुळे मुंबईने गुणतालिकेत तळ गाठले आहे. आता मुंबई फार वर जाण्याची शक्यता कमीच आहे, पण उरलेल्या तिन्ही सामन्यांत जोरदार कामगिरी करत मुंबईला आपला शेवट सुखद करण्याची संधी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;