‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ कार्यक्रमाच्या शुटिंग दरम्यानची धमाल

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ कार्यक्रमाच्या शुटिंग दरम्यानची धमाल

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा कलर्स मराठीवरील कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. प्रसिद्ध अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे याचा हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसायला भाग पाडतोय. नुकताच या शोचा बीटीएस व्हीडीओ समोर आला आहे. रसिकांनी या व्हिडीओला खूप चांगला प्रतिसाद दिला असून कंमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. हे विनोदवीर पडद्यावर तर प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेतच मात्र पडद्यामागेही हे तितकीच धमाल करत असतात. याचबाबतचा व्हीडिओ आता समोर आला आहे.

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ची प्रेक्षकांना भुरळ

कार्यक्रमाचा नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताच या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच ताणून धरली होती. शोचे प्रोमो, टिझर आणि शीर्षक गीत रिलिज झाल्यापासून सोशल मीडियावर याबद्दल चांगलीच चर्चा सुरू होती. आता हा शो सुरु झाला असून रसिकवर्ग भाऊ कदम, निलेश साबळे आणि ओंकार भोजने यांना एकत्र मंचावर पाहून आनंद लुटताना दिसत आहेत. एकंदरीत हा नवीन शो प्रेक्षकांच्या पसंतीस उरलेला दिसत आहे. रसिक या नवीन शोवर भरभरून प्रेम करत आहेत. तशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by @colorsmarathi

कलाकारंची मजा- मस्ती अन् धमाल

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या व्हीडिओमध्ये एपिसोड शूट करतानाची मज्जा, मस्ती आणि धमाल यात दिसत आहे. व्हीडीओत निलेश साबळे , भाऊ कदम, भारत जाधव आणि शोचे प्रोड्युसर देवेन नेगी दिसतोय. भाऊ अन् देवेन यांच्यामधील संवाद ऐकून प्रेक्षकांनाही खूप हसू येईल. मज्जा मस्ती सोबत सेटवरची सर्व कलाकारांची मेहनतही तुम्ही या व्हीडीओत पाहू शकता.

 

View this post on Instagram

 

A post shared by @colorsmarathi

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या शोचं लेखन, दिग्दर्शन डॉ. निलेश साबळे यांने केलं आहे. तर भाऊ कदम, ओंकार भोजने या विनोदवीरांसोबत अभिनेत्री सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकारही दिसत आहेत. हा शो शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर तुम्हाला पाहता येईल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;