लाखो रूपये देत रणबीर कपूरने केला हेअरकट, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, 50 रूपयांमध्ये..

लाखो रूपये देत रणबीर कपूरने केला हेअरकट, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, 50 रूपयांमध्ये..

बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा कायमच चर्चेत असतो. विशेष म्हणजे अभिनेत्याचे चित्रपट चांगलेच धमाका करताना दिसत आहेत. रणबीर कपूर याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. रणबीर कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. रणबीर कपूर हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. रणबीर कपूर याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. रणबीर कपूर हा सध्या त्याच्या रामायण चित्रपटामुळे चर्चेत आहे. रणबीर कपूर याच्या अॅनिमल हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला.

रणबीर कपूर याचे नव्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. रणबीर कपूर याने नव्या लूकसाठी लाखो रूपये खर्च केले आहेत. रणबीर कपूर याने नव्या हेअरकट केलाय. विशेष म्हणजे या एका हेअरकटसाठी त्याने मोठी रक्कम मोजलीये. रणबीर कपूर याने हा नवा हेअरकट आलिम हकीमकडे केला आहे.

आलिम हकीम हे सेलिब्रेटिंचे हेअरकट करताना दिसतात. फक्त रणबीर कपूर हाच नाही तर काही दिवसांपूर्वीच आलिम हकीमने विराट कोहलीचा हेअर कट केला. महेंद्रसिंग धोनी, रजनीकांत, आमिर खान अशा मोठ्या सेलिब्रेटिंचे हेअरकट आलिम हकीमने केले आहेत. एका हेअरकटसाठी मोठी फिस आलिम हकीमकडून घेतली जाते.

काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये आलिम हकीमकडून खुलासा करण्यात आला की, एक लाखापासून ते 15 ते 20 लाखांपर्यंत ते हेअरकटसाठी फीस घेतात. आता रणबीर कपूर याच्या हेअरकटची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. रणबीर कपूर याचा हा नवा लूक त्याच्या चाहत्यांना आवडल्याचे देखील बघायला मिळत आहे.

दुसरीकडे रणबीर कपूर याच्या हेअरकटची खिल्ली उडवताना लोक दिसत आहेत. एकाने कमेंट करत म्हटले की, आमचा कटिंगवाला 50 रूपयांमध्ये हा कट करून देतो. दुसऱ्याने लिहिले की, अरे या कटसाठी इतके पैसे? तिसऱ्याने लिहिले की, उगाच पैशांची उधळण आहे. लोक रणबीर कपूर याच्या हेअरकटच्या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मतदानाचा टक्का का घसरला? पोलिंग बुथवर फिरुन आदित्य ठाकरे यांचा मोठा दावा मतदानाचा टक्का का घसरला? पोलिंग बुथवर फिरुन आदित्य ठाकरे यांचा मोठा दावा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे त्यांच्या मतदारसंघात प्रत्येक बूथवर जावून पाहणी करत आहेत. या पाहणीत त्यांना...
इतक्या वर्षांत अक्षय कुमारने पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला..
‘नेता म्हणून माझी निवड केली का?’, मतदानाचा हक्क बजावल्यानंतर असं का म्हणाला संजय दत्त?
किआरा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा इतक्या वर्षांनंतर करणार असं काम? चर्चांना उधाण
23 वर्षांत इतका बदलला ‘कभी खुशी कभी गम’मधील ‘लड्डू’; ओळखणंच कठीण
शांतिगिरी महाराजांनी EVM कक्षाला हार घातला, गुन्हा दाखल
Lok sabha 2024 : सर्वच पक्षांकडून मुस्लीमांना नकार, 2019 मध्ये 115 तर 2024 मध्ये केवळ 78 जणांना तिकीट