प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक; संतप्त चाहत्यांकडून कारवाईची मागणी

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक; संतप्त चाहत्यांकडून कारवाईची मागणी

सोशल मीडियावर अनेकदा सेलिब्रिटींचे प्रायव्हेट फोटो किंवा व्हिडीओ लीक होतात. हल्लीच्या काळातील हा एक अत्यंत गंभीर मुद्दा बनला आहे. नुकतंच कन्नड टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती रॉयसोबतही असंच काहीसं घडलंय. सोशल मीडियावर या दाक्षिणात्य अभिनेत्रीचे इंटिमेट व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यानंतर तिच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार एका युजरने ज्योतीचे अनेक व्हिडीओ आणि प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. यानंतर एका अनोळखी व्यक्तीनेही धमकी दिली की तिचे व्हिडीओ युट्यूबवर अपलोड केले जातील. या घटनेवर ज्योतीच्या चाहत्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी चाहत्यांनी केली आहे. ज्योतीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर बेंगळुरू पोलिसांना टॅग करत लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कोण आहे ज्योती रॉय?

ज्योती रॉय हे कन्नड इंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे. तिने करिअरची सुरुवात चित्रपटांपासून केली होती. मात्र काही चित्रपटांनंतर तिने टीव्ही इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. ज्योतीने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये 20 पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केलंय. तिला तिची प्रसिद्ध भूमिका बंदे बारतवा कालासाठी ओळखलं जातं. याशिवाय तिने ‘सीतारामा कल्याणा’, ‘गंधादा गुडी’, ’99’ आणि ‘दीया वर्णपतला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. सध्या ती ‘गुपेदंता मानुसू’ या टीव्ही शोमध्ये भूमिका साकारतेय. ज्योती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

ज्योतीचं खासगी आयुष्यही चर्चेत आहे. ती दिग्दर्शक सुकू पूर्वजला डेट करत असून या वर्षाच्या सुरुवातीलाच दोघांनी त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. या दोघांनी साखरपुडा केला आहे. सुकू आणि ज्योती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. याआधी विसाव्या वर्षी ज्योतीने पद्मनाभाशी लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगा आहे. तो आता 11 वर्षांचा झाला आहे. वैवाहिक आयुष्यातील समस्यांनंतर ज्योतीने पद्मनाभाला घटस्फोट दिला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;