पुरावे देताच आढळराव पाटील यांची बोलती बंद; अमोल कोल्हेंनी घेतला चांगलाच समाचार
लोकसभेच्या शिरुर मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपांची खडाजंगी सुरू आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केलेल्या आरोपांबाबत पुरावे सादर करण्याचे आव्हान महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील दिले होते. त्यानंतर कोल्हे यांनी पुरावे सादर करताच आढळराव पाटलांची बोलती बंद झाली आहे. असे आरोप म्हणजे आपल्याला घेरण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे कोणत्याच आरोपांना उत्तर देणार नसल्याचे आढळराव पाटील यांनी म्हटले आहे. त्यावर कोल्हे यांनी ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद झाली आहे, अशा शब्दांत आढळराव पाटलांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांनी ओतूर मध्ये झालेल्या जाहीर सभेत आढळराव पाटील यांच्यावर थेट आरोप केले होते. काहीजण फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले आहेत. संसदेत 60-70 प्रश्न फक्त संरक्षण खात्याविषयी विचारले गेले. हे प्रश्न विचारून कोणाच्या कंपनीच भल होत आहे, हे जनतेला कळतय, असा समचार कोल्हे यांनी घेतला होता.
आढळराव पाटलांनी कोल्हे यांचे सर्व आरोप फेटाळत, पुरावे द्या, राजकारणातून बाजूला होतो, असे आव्हान दिले होते. आढळराव पाटील यांचे आव्हान स्वीकारत कोल्हे यांनी शिरुर तालुक्याच्या दौऱ्यात पाणबुडीवरून क्षेपणास्त्र डागण्याचा प्रश्न एकदा नव्हे तर दोनदा विचारण्यात आल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले. यानंतर लगेच आढळराव पाटील यांनी हा सगळा आपल्याला डॉ. कोल्हे यांच्या कोणत्याच आरोपांना उत्तर द्यायच नाही, असे सांगितले. यावर कोल्हेंनी आढळराव पाटलांना चांगलेच सुनावले.
सुरवातीलाच सांगितले होते, आव्हान दिल्यानंतर शब्द फिरवू नका. पण ट्रेलर बघितल्यावरच त्यांची बोलती बंद झाली. पाणबुडीवरून क्षेपणास्त्र डागण्याचा शिरूर लोकसभा मतदार संघाशी आणि विकासासाठी काय संबंध याच उत्तर त्यांनी द्यावे. तीन टर्म विश्वास ठेवून संसदेत पाठवले होते, मग कोणत्या कंपनीचे भले करण्यासाठी हे प्रश्न विचारले, याच उत्तर आढळरावांनी द्यायला हवे, असे कोल्हे म्हणाले. आढळराव पाटलांनी संरक्षण खात्याला आवश्यक असणाऱ्या सांधनांच्या खरेदी संदर्भातच प्रश्न का विचारलेत, याचे उत्तर देणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे उत्तर देणार नाही, असे म्हणून चालणार नाही, अशा शब्दात कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना सुनावले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List