प्रेयसीचा प्रियकरावर ऑसिड हल्ला
प्रेमीयुगलामध्ये किरकोळ वाद झाला. पण त्या वादाची तिडीक प्रेयसीच्या इतक्या डोक्यात गेली की, तिने प्रियकाराच्या चेहऱयावर ऑसिड फेकल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली. या ऑसिड हल्ल्यात प्रियकराचा चेहरा विद्रूप झाला असून प्रेयसीविरोधात कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गणेश भोयर (29) असे प्रियकराचे तर शोभा त्याच्या प्रेयसीचे नाव आहे.
दोन वर्षांपूर्वी दोघांचे सूत जुळले होते. दोघे लिव्ह इनमध्ये राहत होते, पण गणेशला दारूचे व्यसन होते. कालांतराने दोघे गुलमोहर नगर येथे स्वतंत्र राहू लागले. परंतु त्या खोलीवर प्रेयसीचे काही मित्र येत असल्याने गणेश नाराज होता. दोघांमध्ये मग खटके उडू लागले. दरम्यान गणेश कळमना भाजी मार्पेट येथील सार्वजनिक शौचालयाजवळ उभा असताना गणेशचे दोन मित्र दुचाकीवरून तेथे आले. त्यांच्या सोबत शोभादेखील होती. काही समजायच्या आत शोभाने गणेशच्या अंगावर ऑसिड फेकले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List