कपिल शर्मा शो पडणार बंद? अखेर अर्चना पूरण सिंहने व्हिडीओ शेअर करत..

कपिल शर्मा शो पडणार बंद? अखेर अर्चना पूरण सिंहने व्हिडीओ शेअर करत..

कपिल शर्मा याने एक मोठा काळ गाजवला आहे. कपिल शर्माची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. कपिल शर्मा हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. कपिल शर्माची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. कपिल शर्मा नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा रंगताना दिसत आहे की, कपिल शर्मा याचा कॉमेडी शो द ग्रेट इंडियन कपिल हा बंद होतोय.

द ग्रेट इंडियन कपिल बंद पडत असल्याचे कळाल्यापासून चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळाली. ओटीटीवर शो चालत नसल्याने शो बंद पडत असल्याचे सांगितले गेले. नेटफ्लिक्सने हा निर्णय घेतल्याचे देखील गेले. आता नुकताच यावर मोठा खुलासा करण्यात आलाय. खरोखरच शो बंद पडणार की नाही यावर खुलासा झालाय.

नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार ग्रेट इंडियन कपिल शो हा बंद पडणार नाहीये. आता याचा खुलासा अर्चना पूरण सिंह हिने एका व्हिडीओमध्ये केलाय. यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह बघायला मिळतोय. कॉमेडी शो द ग्रेट इंडियनमध्ये सर्वात अगोदर नीतू कपूर या पोहचल्या होत्या. हेच नाही तर आमिर खान हा देखील कॉमेडी शो द ग्रेट इंडियन शोमध्ये पोहचला.

पोस्ट शेअर करत अर्चना पूरण सिंहने लिहिले की, ‘हे लाफ्टर कमी नाही होणार, कारण अजून एपिसोड्स यायचे आहेत. आता या पोस्टवरून स्पष्ट आहे की, शो बंद पडणार नाहीये. अर्चना पूरण सिंहने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर, राजकुमार राव, बादशाह, सानिया मिर्झा हे स्टार्सही दिसत आहेत. आता हा व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय.

यावेळी आमिर खान हा काही मोठे खुलासे करताना देखील दिसला. आता नुकताच कॉमेडी शो द ग्रेट इंडियनमध्ये सनी देओल आणि बाॅबी देओल हे देखील पोहचले होते. यावेळी दोघांनी अनेक विषयावर भाष्य केले. यावेळी कपिल शर्मा शोमध्ये जुनी पूर्ण टीम देखील दिसत आहे. कपिल शर्मा शोमध्ये धमाल होताना दिसत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;