वरुण धवनचा संताप, ओरडत अभिनेता थेट म्हणाला, तुला आत यायचंय?, अखेर ‘तो’ व्हिडीओ..

वरुण धवनचा संताप, ओरडत अभिनेता थेट म्हणाला, तुला आत यायचंय?, अखेर ‘तो’ व्हिडीओ..

बाॅलिवूड अभिनेता वरुण धवन हा नेहमीच चर्चेत असतो. वरुण धवनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. वरुण धवन हा सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. वरुण धवन याचा काही दिवसांपूर्वीच बवाल हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे बवाल चित्रपटामध्ये तो जान्हवी कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला. वरुण धवन याचे एका मागून एक चित्रपट रिलीज होताना दिसत आहेत. वरुण धवन हा कोट्यवधी संपत्तीचा मालक देखील आहे.

काही दिवसांपूर्वीच एक फोटो शेअर करत वरुण धवन याने जाहीर केले की, आपण लवकरच बाबा बनणार आहोत. आता सध्या वरुण धवन याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये वरुण धवन हा संतापल्याचे बघायला मिळतंय. नेहमी शांत राहणारा वरुण धवन नेमका का चिडला हा प्रश्न चाहत्यांना पडलाय.

वरुण धवन हा रूग्णालयात जात होता. त्याचवेळी वरुण धवन याला पाहून पापाराझींनी त्याला घेरले. यानंतर वरुण धवन थेट एका पापाराझीला म्हणतो की, डाॅक्टरांकडे जात आहे, तुला आत यायचे आहे का? हे म्हणत वरुण धवन हा रागा रागात निघून जाताना दिसतोय. आता सोशल मीडियावर वरुण धवन याचा हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

वरुण धवन नेहमीच पापाराझी यांना फोटोसाठी खास पोझ देताना दिसतो. पहिल्यांदाच वरुण धवन हा पापाराझींवर नाराज झाल्याचे बघायला मिळतंय. यामुळे विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. अभिनेत्यांना पापाराझींनी थोडा त्याचा पर्सनल वेळ द्यायला हवा, असेही अनेकांनी म्हटले आहे. अनेकांना वरुण धवनचा यावेळीचा लूक देखील आवडलाय.

वरुण धवन याने काही दिवसांपूर्वीच नताशा हिच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये नताशाचा बेबी बंप दिसत होता. त्या फोटोसोबतच वरुण धवन याने एक खास पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली होती. वरुण धवन आणि नताशा यांचे लग्न 2021 मध्ये झाले. यांचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने पार पडले. या लग्नाला अनेक बाॅलिवूड स्टारने देखील हजेरी लावली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;