‘टायटॅनिक’च्या कॅप्टनचा अलविदा
‘टायटॅनिक’ सिनेमात कॅप्टनची भूमिका साकारणारे अभिनेते बर्नार्ड हिल (79) यांचे रविवारी निधन झाले. बर्नार्ड यांनी केट विन्सलेट आणि लिओनार्डो डिपॅप्रिओच्या 1997 मध्ये आलेल्या ‘टायटॅनिक’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटात कॅप्टन एडवर्ड स्मिथची भूमिका साकारली होती. ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ मध्ये त्यांनी किंग थिओडेनची व्यक्तीरेखा साकारली होती. श्रद्धांजली वाहताना अभिनेत्री बार्बराने म्हटले की, ‘जॉन पॉल जॉर्ज रिंगो अँड बर्ट’ या शोमध्ये आम्ही एकत्र काम केले होते. तो एक अप्रतिम अभिनेता होता.’
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List