मिंधे-भाजपच्या हुल्लडबाजांना निष्ठावंत शिवसैनिकांचा दणका; खारदांडा शाखेसमोर दाखवला इंगा

मिंधे-भाजपच्या हुल्लडबाजांना निष्ठावंत शिवसैनिकांचा दणका; खारदांडा शाखेसमोर दाखवला इंगा

भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार अॅड. उज्ज्वल निकम यांच्या प्रचारफेरीदरम्यान खारदांडा येथील शिवसेनेच्या शाखेसमोर हुल्लडबाजी करीत धिंगाणा घालणाऱया मिंधे-भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी चांगलाच दणका दिला. शिवसैनिकांचा रुद्रावतार पाहून अखेर मिंधे-भाजपच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला.

लोकसभा निवडणुकीचा प्रचारासाठी भाजपचे उमेदवारी अॅड. उज्ज्वल निकम यांची प्रचारफेरी खारदांडा येथे आयोजित करण्यात आली होती. ही रॅली दुपारी 12 वाजताच्या सुमारास शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेसमोर आली असता मिंधे-भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक जोरदार घोषणाबाजी केली. शिवाय शाखेवर चालून येत विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेनेने सुरुवातीला हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून देत संयम पाळला. मात्र तरीदेखील मिंधे-भाजपचे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी पोलिसांनाही जुमानले नाही. पोलिसांना ढकलून देत शिवसेना शाखेसमोर धिंगाणा घालीत जाणीवपूर्वक जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. या प्रकाराची माहिती मिळताच शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या या भागातील हजारो निष्ठावंतांनी शाखेच्या ठिकाणी धाव घेत जोरदार प्रत्युत्तर दिल्याने मिंधे-भाजपचे हुल्लडबाज पळून गेल्याची माहिती  वांद्रे विधानसभा उपविभागप्रमुख चिंतामणी निवाटे यांनी दिली.

शाखेवर हल्ला करण्याचा प्रयत्न

मिंधे-भाजपच्या हुल्लडबाजांनी शिवसेना शाखेवर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला. यावेळी शिवसैनिकांनी हुल्लडबाजांना हुसकावून लावले. ‘पन्नास खोके, माजलेत बोके’, ‘अब की बार, भाजप तडीपार’, ‘गद्दारांचा निषेध असो’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. अखेर शिवसैनिकांचा रुद्रावतार पाहून मिंधे-भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतल्याची माहितीही चिंतामणी निवाटे यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;