उद्धव ठाकरे यांच्या आज धुळे, जळगावात झंझावाती सभा
जळगाव लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार करण पवार आणि धुळे मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उद्या झंझावाती सभा होणार आहेत.
एकीकडे महाराष्ट्रात उद्या तिसऱया टप्प्यातील मतदान होत असताना दुसरीकडे पुढच्या टप्प्यांसाठी महाविकास आघाडीने प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. त्यात धुळे शहरातील जेलरोड येथे उद्या दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.
धुळ्यानंतर जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान (जी. एस. ग्राऊंड) येथे करण पवार यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सायंकाळी पाच वाजता सभा होणार आहे. महाविकास आघाडीच्या या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून शिवसैनिक व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List