देवेगौडांच्या नातवाची हसनमध्ये दहशत, सेक्स स्कँडलच्या शिकार ठरलेल्या अनेक महिला बेपत्ता

देवेगौडांच्या नातवाची हसनमध्ये दहशत, सेक्स स्कँडलच्या शिकार ठरलेल्या अनेक महिला बेपत्ता

भाजप आघाडीत सामील झालेले माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा खासदार नातू प्रज्वल रेवण्णाच्या सेक्स स्कँडलचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे या स्कँडलच्या शिकार ठरलेल्या अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यातील अनेक महिला गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असून हसन मतदारसंघात प्रज्वलची प्रचंड दहशत दिसून येत आहे.

कर्नाटक पोलिसांनी सेक्स स्कँडलमधील पीडित महिलांसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. जर्मनीत पळून गेलेल्या प्रज्वलने सात दिवसांत हजर होतो असे म्हटले होते, मात्र त्याने अद्याप संपर्क साधला नसून त्याच्या शोधासाठी ब्लू कॉर्नर नोटीस एसआयटीने जारी केली आहे. महिलेला अपहरण आणि बळजबरीने डांबून ठेवण्याच्या आरोपांखाली पोलीस कोठडीत असलेले त्याचे वडील आणि माजी मंत्री एचडी रेवण्णा यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

प्रज्वलची शिकार बनलेल्या महिलांचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यापासून गेल्या 10 दिवसांत हसन जिह्यातील अनेक महिलांनी आपली घरे सोडली आहेत. ज्या महिलेने पहिली तक्रार केली होती तिचे कुटुंबही घराला टाळे लावून घर सोडून गेले आहे. पक्षासाठी काम करणाऱया अनेक महिलांनी संपर्क तोडला आहे. पती संशय घेऊ लागल्यानेही यातील अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, असे एका जेडीएस नेत्याने सांगितले.

रेवण्णा यांची दहशत

रेवण्णा कुटुंबाची दहशत असल्यामुळे जिह्यात कुणीही नाव घेऊन काहीही बोलायला तयार नाही. प्रज्वलबद्दल तक्रार करणाऱया एका पक्षकार्यकर्तीनेही जिल्हा, गाव सोडले आहे. या कुटुंबांना खटले दाखल करायचे नाहीत कारण रेवन्नाच्या कुटुंबाविरुद्ध खटला लढताना हसनमध्ये टिकून राहणे अशक्यच आहे, असे काही गावांत सांगण्यात आले.

– पडुवल्लाहिप्पे गावात प्रज्वल रेवण्णाचे मोठे फार्महाऊस आहे. प्रज्वल रेवण्णा वारंवार या फार्महाऊसमध्ये यायचा. गुह्यातील काही व्हिडीओ इथेच शूट झाल्याचाही पोलिसांना संशय आहे.

एचडी देवेगौडा, कुमारस्वामी यांचे मीडियावर निर्बंध

नातू गायब आणि मुलगा तुरुंगात अशा काsंडीत सापडलेले माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि त्यांचे दुसरे पुत्र कुमारस्वामी यांनी 89 मीडियांना त्यांच्या उल्लेखाने काहीही बातमी वा पह्टो आदी छापण्यास मनाई करणारा आदेश आज सेशन्स कोर्टाकडून मिळवला आहे.

तब्बल 2900 व्हिडीओ

एका इंग्रजी दैनिकाने हसन जिल्हय़ातील भीषण वास्तव मांडले. खुद्द जेडीएसच्या कार्यकर्त्यांनी आणि तपास करणाऱया पोलीस अधिकाऱयांनीच धक्कादायक माहिती दिली. प्रज्ज्वल रेवण्णाने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. त्याने रेकॉर्ड केलेले तब्बल 2900 व्हिडीओ क्लिप आहेत. याची आम्हाला कल्पनाच नव्हती, अशी माहिती अधिकाऱयाने दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;