बारामतीत इन कॅमेरा मतदान घ्या, सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मागणी

बारामतीत इन कॅमेरा मतदान घ्या, सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मागणी

बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर, दौंड आणि खडकवासला या तालुक्यांमध्ये मतदान प्रक्रिये वेळी गैरप्रकार होऊ शकतात. हे प्रकार रोखण्यासाठी ते पूर्णपणे संवेदनशील जाहीर करून इन कॅमेरा मतदान घ्या. मतदानाची प्रक्रिया सुरू असताना पॅमेरेही उपलब्ध असावेत, अशी मागणी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांना आज पत्र देऊन ही मागणी केली आहे. निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये बारामती मतदारसंघात दमदाटीच्या अनेक तक्रारी होत्या. तसाच प्रकार मतदानावेळी घडू शकतो, अशी भीती त्यांनी पत्रात व्यक्त केली.

n मला मिळालेल्या माहितीनुसार या विधानसभा मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्याचबरोबर पोलीस प्रशासनानेही अतिसंवेदनशील मतदान पेंद्रांवर बंदोबस्त ठेवावा, असे सुप्रिया सुळे यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;