कुकरमध्ये आयईडी लपवून बॉम्बस्फोटाचा  डाव उधळला

कुकरमध्ये आयईडी लपवून बॉम्बस्फोटाचा  डाव उधळला

लोकसभा निवडणुकीदरम्यान कुकरमध्ये आयईडी लपवून बॉम्बस्पह्ट घडवण्याचा माओवाद्यांचा कट गडचिरोली पोलिसांनी उधळून लावला. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांना टिपागड परिसरात काही स्पह्टके लपवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली होती. परंतु नेमकी स्पह्टके कशात लपवली आहेत आणि कुठे लपवली आहेत याची माहिती नव्हती. त्यामुळे वेळीच खबरदारी घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि शोधमोहीम राबवली. शोधमोहीम सुरू असतानाच स्पह्टके नेमकी कोणत्या ठिकाणी लपवून ठेवली आहेत याची माहिती मिळाली. टिपागडमधील डोंगराळ भागात स्पह्टके कुकरमध्ये लपवून ठेवण्यात आली होती. स्पह्टके निकामी करण्यासाठी सी 60 चे एक पथक आणि सीआरपीएफचे एक क्वॅट पथक रवाना करण्यात आले. पोलिसांना स्पह्टके आणि डिटोनेटरने भरलेले 6 प्रेशर कुकर सापडले. स्पह्टके आणि लोखंड, पत्र्याचे तुकडे भरलेले 3 पाइपदेखील सापडले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;