राहुरीत 11 वर्षांच्या मुलाचा उष्माघाताने मृत्यू

राहुरीत 11 वर्षांच्या मुलाचा उष्माघाताने मृत्यू

राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील 11 वर्षीय मुलगा साई गोरक्षनाथ मुसमाडे याचा उष्माघाताने मृत्य झाल्याची घटना रविवार 5 मे रोजी घडली आहे. वाढत्या उन्हामुळे साई याचा बळी गेल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे.

तांभेरे येथील गोरक्षनाथ मुसमाडे यांचा एकुलता मुलगा साई हा ज्ञानवर्धिनी स्कुलमध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. उन्हाचा तडाखा बसल्याने साई याला उलटी व जुलाब त्रास झाला.त्यानंतर त्यास लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

वाढत्या उन्हाचा तडाखा बसल्याने साई याला त्रास होऊन मृत्यूचा सामना करावा लागला आहे. साई याच्यावर रविवारी तांभेरे येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत साई याच्या मागे आई व वडील असा परिवार आहे. साई मुसमाडे हा मच्छीन्द्र मुसमाडे यांचा पुतण्या तर संतोष व संदीप मुसमाडे यांचा चुलत भाऊ होता.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वाढत्या उन्हात घरा बाहेर पडतांना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;