हातात वस्तरा घेऊन मिशा काढायला तयार रहा, रोहीत पवार यांचा अजित पवारांना टोला

हातात वस्तरा घेऊन मिशा काढायला तयार रहा, रोहीत पवार यांचा अजित पवारांना टोला

बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या नणंद भावजया एकमेकांसमोर लढत आहेत. या मतदारसंघात उद्या ७ मे रोजी मतदान होणार आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी या बाबत बोलताना 4 जून नंतर या मतदारसंघात फक्त मी एकटाच पवार उरणार आहे. बाकी कुणी पवार दिसणार नाहीत. जर दिसले तर मी मिशा उडवेन असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. आज रोहीत पवार यांनी देखील एक पोस्ट शेअर करत अजित पवार यांना हातात वस्तरा घेऊन मिशा काढायला तयार रहा असा इशारा दिला आहे.

”ज्यांनी कॅन्सरलाही पराभूत केलं, भाजपसारख्या महाशक्तीलाही पाणी पाजलं, सत्तेच्या दबावाला सत्याच्या ताकदीवर झुकवलं तो आहे महाराष्ट्राचा सह्याद्री…. अजिंक्य योद्धा आदरणीय पवार साहेब! अनेकजण एकाच मतदारसंघात अडकून पडले पण या योद्ध्याने गेल्या 22 दिवसात तब्बल 52 सभा घेऊन भाजप सरकारविरोधात रान उठवलं…. आणि कालपासून तब्येत बरी नसताना आणि डॉक्टरांनी दौऱ्याला विरोध केला असतानाही हा योद्धा केवळ 1 दिवसाची क्षणभर विश्रांती घेऊन पुन्हा मैदानात निघालाय… हाती विचारांचं हत्यार घेऊन… म्हणतात ना… योद्धा कधी जखमांच्या वेदना उगाळत बसत नाही. त्यामुळे काही लोकांनी हाती वस्तरा घेऊन तयार रहावं…. मिशा_काढण्यासाठी”, असा टोला रोहीत पवार यांनी लगावला आहे.

रोहीत पवार यांनी या पोस्टसोबत शरद पवार यांचे 8 मे ते 10 मे चे कार्यक्रम शेअर केले आहेत. यात शरद पवार हे तिनही दिवस पश्चिम महाराष्ट्रात बैठका घेणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;