साहेब आराम करून पुन्हा जोमाने सभा घेतील, विरोधकांनी फार खूश होण्याचे कारण नाही; अमोल कोल्हे यांचा टोला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ जाणवत असल्याने त्यांचे सोमवारचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. थकवा जाणवत असल्यानं डॉक्टरांनी शरद पवारांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवार सोमवारी शिरुर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यासाठी प्रचारासभा घेणार होते. पण, थकवा जाणवत असल्याने शरद पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यावरून अमोल कोल्हे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
थकवा जाणवत असल्यानं डॉक्टरांनी शरद पवारांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शरद पवारांची सभा रद्द करण्यात आली आहे. पवार साहेब उन्हात तीन-तीन चार-चार सभा घेत आहेत. मीही सभा घेत असताना काय त्रास होतो, याची मला जाणीव आहे. शरद पवार यांना उन्हाचा त्रास होत असल्यामुळे एक दिवस आराम करून ते पुन्हा जोमाने सभा घेतील आणि आम्ही प्रचार करू, त्यामुळे माझ्या मतदारसंघातील विरोधकांनी फार खुश होण्याचे कारण नाही, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List