समंथाच्या फेक न्यूड फोटोप्रकरणी चाहत्यांकडून संताप व्यक्त; म्हणाले ‘तिच्या आजारपणात..’

समंथाच्या फेक न्यूड फोटोप्रकरणी चाहत्यांकडून संताप व्यक्त; म्हणाले ‘तिच्या आजारपणात..’

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या काही काळापासून मायोसिटीस या ऑटोइम्युन आजाराचा सामना करतेय. परदेशातील उपचारानंतर समंथा भारतात त्यावर विविध उपचार घेत आहे. कधी अत्यंत कठीण व्यायाम तर कधी बर्फाच्या पाण्यात बसून वेदनांना कमी करण्याचा प्रयत्न तिने केला. नुकताच तिने आणखी एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, ज्यामध्ये ती इन्फ्रारेट साऊना थेरपी घेताना दिसत होती. मात्र हा फोटो शेअर केल्यानंतर काही वेळातच समंथाचे काही फेक न्यूड फोटोसुद्धा व्हायरल झाले. हे फेक न्यूड फोटो पाहून तिचे चाहते खूपच भडकले आहेत. त्यांनी संबंधित युजर्सवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. समंथाचे हे फेक फोटो व्हायरल होण्यापासून थांबवा, अशीही विनंती त्यांनी केली आहे.

‘बरं होण्यासाठी आणि आजारपणातून बाहेर पडण्यासाठी सतत पर्यायी पद्धतींचा शोध घेत आहे’, असं लिहित समंथाने तिच्या थेरपीचा फोटो पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये तिने इन्फ्रारेट साऊना थेरपीचे फायदेसुद्धा लिहिले आहेत. ‘स्नायूंमधील रक्ताभिसरण सुधारते, चयापचय वाढवतं, शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते, ऊर्जा वाढते, शरीर डिटॉक्स होते, सेल्युलाइट कमी होतात, त्वचा टवटवीत होते, ताकद वाढते, सांधे आणि स्नायूंच्या वेदना कमी होतात आणि लवचिकता वाढते’, अशी फायद्यांची यादीच तिने लिहिली आहे.

समंथाने तिच्या आजारपणाविषयी आणि त्यावरील उपचाराविषयी लिहिलं असताना काही सोशल मीडिया युजर्सने तिचे फेक फोटो व्हायरल केले. समंथानेच तिच्या स्टोरीमध्ये हे न्यूड फोटो पोस्ट केले आणि लगेच डिलिट केले, असा दावा युजर्सनी केला आहे. तर समंथाच्या चाहत्यांनी ते फोटो फेक असल्याचं म्हटलंय. आजारपणाबद्दल जागरूकता निर्माण करणाऱ्या समंथाचे असे फेक फोटो व्हायरल करणं थांबवा, अशी विनंती चाहत्यांनी केली आहे. त्याचसोबत संबंधित युजर्सवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

समंथाने 2022 मध्ये तिला मायोसिटीस हा ऑटोइम्युन आजार असल्याचा खुलासा केला होता. उपचारादरम्यानच तिचा ‘यशोदा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी समंथा असमर्थ होती. त्यामुळे तिने आजारपणाचा खुलासा करावा, असं टीमकडून सांगण्यात आलं होतं. मायोसिटीसमुळे ‘यशोदा’चं प्रमोशन करू शकणार नाही असं स्पष्ट केल्यास लोक तुला समजून घेतील, असं तिला म्हटलं गेलं होतं. त्यामुळे समंथाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिच्या आजारपणाविषयी खुलासा केला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;