सत्ता बदलाचे वारे विखेंना लवकर कळतात; आमदार बाळासाहेब थोरातांचा टोला

सत्ता बदलाचे वारे विखेंना लवकर कळतात; आमदार बाळासाहेब थोरातांचा टोला

नगरसह राज्यामध्ये महाविकास आघाडीला वातावरण अतिशय चांगले आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना सत्ता कोणाची येणार, हे लवकर कळते, असा टोला आमदार बाळासाहेब थोरात यांनी लगावून त्यांना पक्षात घेताना निश्चितपणे मला विचारले जाईल, असेही त्यांनी सांगितले. तर, नुकत्याच झालेल्या विदर्भ-मराठवाडय़ातील निवडणुकीमध्ये क्वचितच एखादी जागा भाजपला मिळेल. मात्र, इतर जागा या महाविकास आघाडीला मिळतील, असा दावाही त्यांनी केला.

नगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ येथील सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड परिसरामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाधक्ष जयंत वाघ व किरण काळे उपस्थित होते.

आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, नगरबरोबरच राज्यामध्ये महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे हे दोन वेळा काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना भेटले. यावर विचारले असता, थोरात म्हणाले, मलासुद्धा थोडी माहिती मिळालेली होती. मात्र, सगळ्याच गोष्टी उघड करायच्या नसतात. विखे यांना अगोदर कळतं की कुणाची सत्ता येणार आहे. पण, त्यांना प्रवेश देताना मला विचारल्याशिवाय होणार नाही, असेही ते म्हणाले. या अगोदरसुद्धा या कुटुंबाने गेल्या पंधरा वर्षांमध्ये अनेक वेळेला पक्ष बदललेले आहेत. जिथे सत्ता येते तिथे जातात. हा अनुभव असल्याचाही टोला त्यांनी लगावला.

नीलेश लंके नगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. ते सामान्य भागातून आलेले आहेत. त्यांची लढाई एका धनदांगडय़ासोबत आहे, की ज्यांच्या ताब्यामध्ये अनेक संस्था आहेत. आर्थिक ताकद मोठी असलेल्यांबरोबर त्यांचा सामना आहे. त्यांना पाडण्यासाठी भाजप आणि दिग्गजांच्या सभा येथे घेतल्या आहेत. मात्र, यामध्ये नीलेश लंके यांचा विजय निश्चित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज ठाकरे आता कोणाच्या तरी दबावाखाली असल्यासारखे वाटतात. तसेच मराठवाडा, विदर्भ येथेही महाविकास आघाडीला चांगले वातावरण होते. तर, विखे यांचीही घराणेशाही आहे, त्यामुळे भाजपला घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नसल्याचेही आमदार थोरात म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;