निकालानंतर अजित पवार यांना मिशा काढाव्या लागतील, सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांची जोरदार टीका

निकालानंतर अजित पवार यांना मिशा काढाव्या लागतील, सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांची जोरदार टीका

बारामती लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा 4 जूनला निकाल लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिशा काढाव्या लागतील, असे अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी म्हटले आहे. तसेच पवार कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांची आई नाराज झाली. माझा मुलगाही मला प्रिय आहे आणि दीरही तितकेच प्रिय आहेत. मला तुमच्या दोघांच्या लढाईत पडायचे नाही, असे सांगत आई आशा पवार बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेली आहे. अजितदादांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळेच आपण त्यांची साथ सोडल्याचे श्रीनिवास पवार यांनी सांगितले.

शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित गटाकडून सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही बारामतीमध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीनंतर आपण सोडून दुसरं कोण बारामतीत दिसलं तर आपण मिशा काढू, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्याला श्रीनिवास पवार यांनी आज उत्तर दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;