उजनीतून 10 मे रोजी सोलापूरसाठी पाणी सोडणार – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

उजनीतून 10 मे रोजी सोलापूरसाठी पाणी सोडणार – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून दिनांक 10 मे रोजी पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

सोलापूर शहर महानगरपालिकेकडून उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबतचे मागणी पत्र देण्यात आलेले आहे. दिनांक २० मे पर्यंत उजनी धरणातील पाणी वरील बंधाऱ्यात पोहोचल्यास सोलापूर महापालिकेचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे. सोलापूर महापालिका हद्दीतील नागरिकांना महापालिकेच्या वतीने वेळेत पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिनांक १० मे रोजी उजनी धरणातून पाणी सोडण्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे. हे पाणी औज व चिंचपूर बंधाऱ्यात पोहोचण्यासाठी दहा दिवसाचा कालावधी लागतो. अंदाजे साडेपाच टीएमसी पाणी उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडले जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;