T-20 World Cup 2024 : विश्वचषक जिंका आणि करोडपती व्हा; PCB चे खेळाडूंना आश्वासन

T-20 World Cup 2024 : विश्वचषक जिंका आणि करोडपती व्हा; PCB चे खेळाडूंना आश्वासन

2 जूनपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी सर्व संघांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानने सुद्धा चांगली मेहनत घेतली असून त्यांना आर्मी कॅम्पमध्ये ट्रेनिंग देण्यात आली होती. मात्र आता पाकिस्तानच्या खेळाडूंना करोडपती होण्याची संधी आहे. कारण पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.

आगामी विश्वचषकासाठी टीम इंडिया, वेस्ट इंडिज आणि न्युझीलंड सहित अनेक संघांनी आपला संघ जाहीर केला आहे. मात्र पाकिस्तानने अद्याप आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केलेला नाही. पुढील काही दिवसांमध्ये संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र जर पाकिस्तानचा संघ टी-20 विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला तर प्रत्येक खेळाडूला 2.77 कोटी पाकिस्तानी रुपये मिळणार आहेत. तशी घोषणा पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर केली. यावेळी त्यांनी खेळाडू आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली.

“मला आशा आहे की यावेळी तुम्ही पाकिस्तानचा राष्ट्रध्वज उंच फडकवाल. चांगले खेळा, तीव्र स्पर्धा करा आणि मैदानावर उत्साही प्रदर्शन ठेवा. विजय तुमचा आहे. अन्य कोणत्याही दबावाकडे लक्ष देऊ नका, केवळ पाकिस्तानच्या अभिमानासाठी खेळा, ” असा मौल्यवान सल्ला मोहसीन नक्वी यांनी खेळाडूंना दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;