श्री विठ्ठल रुक्मिणी गाभारा संवर्धन काम महिना अखेर पूर्ण होणार

श्री विठ्ठल रुक्मिणी गाभारा संवर्धन काम महिना अखेर पूर्ण होणार

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू आहेत. त्यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम 15 मार्चपासून सुरू करण्यात आले आहे. सदरचे काम 45 दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. तथापि, कामास सुरुवात केल्यानंतर अनेक प्रकारची नव्याने दुरुस्ती करण्याचे निदर्शनास आल्याने, मे 2024 अखेर सदरचे काम पूर्ण करून भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पूर्ववत करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह.अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी दिली.

शनिवारी 4 मे रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सर्व सदस्य यांनी पुरातत्त्व विभाग, वास्तुविशारद व ठेकेदार यांच्या समवेत गाभाऱ्याची पाहणी करण्यात आली. तदनंतर सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बैठक घेण्यात आली. तसेच गाभारा संवर्धन कामाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी महाराज, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ऍड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, दूरदृष्यप्रणालीद्वारे अतुलशास्त्री भगरे गुरुजी तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, ठेकेदार रमेश येवले व बांधकाम विभाग प्रमुख बलभीम पावले उपस्थित होते.

गहिनीनाथ औसेकर महाराज म्हणाले, श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम करतेवेळी मूर्तीच्या संरक्षणास कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही, याची दक्षता घेणे व मूर्ती संरक्षणास प्राधान्य देणे गरजेचे आहे. गाभाऱ्यातील फरशी काढल्यानंतर काही नव्याने कामाच्या बाबी निदर्शनास आल्यामुळे व काम दर्जेदार व पुढील अनेक वर्ष टिकेल या दृष्टीने काम करण्यात येत आहे. सदरचे काम माहे मे, 2024 अखेर पूर्ण करण्यात येत आहे. काम पूर्ण झाल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पूर्ववत करण्यात येईल, तोपर्यंत सध्या सुरू असणारी दर्शनी व्यवस्था कायम ठेवण्यात येणार आहे.

श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाच्या कामांबाबत पुढील 15 दिवसात मंदिर समिती, सल्लागार परिषद, वारकरी प्रतिनिधी, पत्रकार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समवेत जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. सदर कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई झालेली नाही, कामे दर्जेदार व मूर्तीचे संरक्षण करून करावयाची असल्याने वारकरी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;