सुनिधी चौहानवर कॉन्सर्टमध्ये बाटली फेकली, व्हिडीओ पाहून चाहते संतापले

सुनिधी चौहानवर कॉन्सर्टमध्ये बाटली फेकली, व्हिडीओ पाहून चाहते संतापले

बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका सुनीधी चौहान सध्या चर्चेत आली आहे. सध्या तिचा एका लाईव्ह कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कॉन्सर्ट सुरु असताना एकाने बाटली फेकल्याचे दिसत आहे. तो व्हिडीओ पाहून चाहते प्रचंड संतापले आहेत.

आपल्या सुरेल आवाजाने अनेकांची मनं जिंकणारी सुनिधी अनेक लाईव्ह कॉन्सर्ट करतानाही दिसली आहे. जिथे जगभरातून तिचे चाहते तिचा आवाज ऐकण्यासाठी येतात. मागच्या काही दिवसात सुनिधी एकामागोमाग एक लाईव्ह कॉन्सर्ट करताना दिसली आहे. शुक्रवारी देहरादूनमध्ये कॉलेजमध्ये कॉन्सर्ट सुरु होता. त्या दरम्यान गर्दीतून एकाने तिच्यावर बॉटल फेकली. यावर तिने बॉटल फेकणाऱ्यावर न रागावता मजेदार पद्धतीने उत्तर दिले. ती म्हणाली हे काय आहे? बॉटल फेकल्याने काय होणार आहे? शो थांबेल, तुम्हाला असे वाटते का की शो थांबावा? तिची ही प्रतिक्रिया ऐकून गर्दीतून चाहते नाही असे ओरडताना दिसत आहे.

या दरम्यान सुनिधी चौहानने स्पोर्ट जर्सी स्टाईलमध्ये मीडि ड्रेस, ग्लॅम मेकअप आणि मोकळ्या केसात दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सोशल मीडियावर त्यांचे चाहते तिच्या पाठिंब्यासाठी उतरले आहेत. एका युजरने लिहीले, तिच्या कामाचा आदर आणि सन्मान करा. दुसऱ्या युजरने लिहीले की, ती एवढी पावरफुल आहे की अशाप्रकारच्या वस्तू फेकल्याने तिला काही फरक पडत नाही. तर अन्य एकाने लिहीले की, ज्याने कोणी हे असे केले त्याला तुरुंगात टाका आणि पुन्हा असे काही करणार नाही याची काळजी घ्या अशा विविध प्रतिक्रिया तिच्या चाहत्यांमधून येत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;