‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये ऐश्वर्याच्या मेहंदीला खास पाहुण्यांची उपस्थिती
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत ऐश्वर्याच्या मेहंदीचा सोहळा रंगणार आहे. या मेहंदीच्या कार्यक्रमात खास पाहुणे उपस्थित राहणार आहेत. 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजना या मेहंदीच्या कार्यक्रमाला येणार आहे.
फक्त संजनाच नाही तर 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेतील कला आणि बहिणींची खास हजेरी पहायला मिळणार आहे. 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेतील रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबात सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाची धूम सुरू आहे.
दोन्ही कुटुंबातील वैर मिटवण्यासाठी जानकी आणि हृषिकेशने पुढाकार घेतला आहे. त्यांनीच ऐश्वर्या आणि सौमित्रचा लग्नाचा घाट घातला होता. मात्र सौमित्रने अवंतिकासोबत लग्न करण्याचं ठरवल्याने संतापलेल्या ऐश्वर्याला सारंगशी लग्न करण्याचा नवीन डाव आखला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List