गावकऱयांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळले; गडचिरोलीतील घटना

गावकऱयांनी  महिलेसह दोघांना  जिवंत जाळले; गडचिरोलीतील घटना

जादूटोण्याच्या संशयावरून एका महिलेसह दोघा जणांना गावकऱयांनी निर्दयपणे मारहाण करून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिह्यातील बर्सेवाडा येथे घडली.

या घटनेत जमनी तेलामी (52) आणि देऊ आतलामी (60) यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पोलिसांनी 15 जणांना अटक केली. आरोपींमध्ये मृत जमनी हिचा पती देवाजी तेलामी (60) व मुलगा दिवाकर तेलामी (28) यांचा समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी या गावातील एका बालकाचा मृत्यू झाला होता. या बालकाचा मृत्यू जादूटोण्यामुळे झाल्याचा आरोप करत गावातील काही लोकांनी 1 मे रोजी पंचायत बोलावली. संतप्त गावकऱयांनी जमनी आणि देऊ यांना मारहाण करत पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;