उद्धव ठाकरे यांची आज अलिबाग, ऐरोलीत सभा

उद्धव ठाकरे यांची आज अलिबाग, ऐरोलीत सभा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या रायगड व नवी मुंबईत धडाडणार आहे. रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी अलिबाग येथील समुद्रकिनाऱयावरील जेएसएम मैदानावर दुपारी 3 वाजता तर ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी ऐरोलीतील सेक्टर 3 मधील श्रीराम विद्यालय येथे सायंकाळी 5.30 वाजता जाहीर सभा होणार आहे. या दोन्ही सभांची जोरदार तयारी करण्यात आली असून शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 7 मे रोजी होणार आहे.  या निवडणुकीत महाविकास इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराचा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धुरळा उडवून दिला आहे. उद्या होणाऱया सभेत उद्धव ठाकरे विरोधकांवर भीमटोला हाणणार आहेत, तर ठाणे लोकसभेची निवडणूक 20 मे रोजी होणार आहे. या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सायंकाळी 5.30 वाजता ऐरोलीतील सेक्टर 3 मधील श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणात दुसरी जाहीर सभा होणार आहे. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, मुझफ्फर हुसेन, आपचे राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांच्यासह शिवसेना आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;