महानायकांची ग्रेटभेट… अमिताभ-रजनीकांत 32 वर्षांनी एकत्र झळकणार

महानायकांची ग्रेटभेट… अमिताभ-रजनीकांत  32 वर्षांनी एकत्र झळकणार

बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि साऊथ सुपरस्टार रजनीकांत या दोन महानायकांची नुकतीच मुंबईत ग्रेट भेट झाली. निमित्त होते ते आगामी ‘वेट्टैयन’ या चित्रपटाच्या सध्या मुंबईत सुरू असलेल्या शूटिंगचे. या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन्ही सुपरस्टार तब्बल 32 वर्षांनी एकत्र झळकणार आहेत. यापूर्वी 1991 मध्ये रिलीज झालेल्या ‘हम’ या चित्रपटात दोघेही शेवटचे एकत्र दिसले होते.

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर या भेटीची काही छायाचित्रेही शेअर केली आहेत, ज्यात दोन्ही कलाकारांनी सूट परिधान केला असून एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत. ‘वेट्टैयन’ हा रजनीकांत यांचा 170 वा चित्रपट असून यात बिग बी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत. याच वर्षी ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

रजनीकांत अजूनही डाऊन टू अर्थ

रजनीकांत यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर करताना बिग बी आपल्या ब्लॉगमध्ये म्हणाले, ‘रजनीकांत यांच्यात किंचितही बदल झालेला नाही. तोच नम्र, साधा आणि डाऊन टू अर्थ डायनॅमिक स्टारत्यांच्यासोबत काम करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;