अनुज थापन प्रकरण; कोठडीतील मृत्यूस गृह मंत्रालय जबाबदार, संजय राऊत यांचा आरोप
पोलीस कोठडीत संशयित आरोपीचा मृत्यू झाला आहे याचा अर्थ या घटनेला महाराष्ट्राचे गृह मंत्रालय, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त जबाबदार आहेत. या आत्महत्येप्रकरणी अधिक तपासाची गरज आहे. आम्ही तशी मागणी करतो. मात्र ही मागणी करून काहीच होणार नाही. कारण त्यासाठी सरकार बदलणे आवश्यक आहे. कारण सरकार बदलले तर अशा प्रकरणात तपास होईल अन्यथा गृहमंत्री व पोलीस हे प्रकरण दाबतील, अशी शंकाही संजय राऊत यांनी व्यक्त केली.
राज्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्दय़ावरून उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांनी लक्ष्य केले आहे. सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अनुज थापनने पोलीस कोठडीत आत्महत्या केली. या प्रकरणात अनेक रहस्य आहेत असे संजय राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List