आघाडीचा धर्म पाळा! उध्दव ठाकरे यांचा पारनेरच्या शिवसैनिकांशी संवाद

आघाडीचा धर्म पाळा! उध्दव ठाकरे यांचा पारनेरच्या शिवसैनिकांशी संवाद

आताची लढाई माझी तुमची नाही. तुम्हाला सर्वांना माहीती आहे की ही लढाई राज्याच्या अस्मितीची आहे. देशाच्या लोकशाहीसाठीची आहे. कुठेही गडबड करू नका. गोंधळ करू नका. आघाडीचा धर्म पाळून आपल्याला लोकशाहीचे सरकार आणावे लागेल. मी तुम्हाला धन्यवाद देतो. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो असे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पारनेरच्या शिवसैनिकांना महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

शिवसेना उपनेते तथा महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी भाजपा उमेदवार डॉ. सुजय विखे यांना पाठींबा देण्याचा परस्पर निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र उध्दव ठाकरे यांचा आदेश शिरोधार्ह मानण्याचा निर्णय घेत सर्व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परीषदेत तशी भुमीका मांडली. त्यानंतर शनिवारी जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या उपस्थितीमध्ये पारनेर शहरातील सेनापती बापट सभागृहात शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यादरम्यान उध्दव ठाकरे यांनी तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्याशी संपर्क करून शिवसैनिकांशी संवाद साधला.

या मेळाव्यासंदर्भात बोलताना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी सांगितले की, मेळाव्यात विविध शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार आपला पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याने आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत. येत्या दोन-तीन दिवसांत तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून या मेळाव्यास पक्षाचे राज्य पातळीवरील ज्येष्ठ नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याचे नियोजनही या बैठकीत करण्यात आल्याचे डॉ. श्रीकांत पठारे यांनी सांगितले.

जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रवी वाकळे, तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, महिला आघाडी तालुका प्रमुख प्रियंका खिलारी, युवासेना तालुकाप्रुख अनिल शेटे, डॉ. भास्कर शिरोळे, नगरसेवक राजू शेख, बाजार समितीचे संचालक किसन सुपेकर, तालुका संघटक अमोल गजरे यांच्यासह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;