नाशिक महानगरपालिका हद्दीत 800 कोटींचा भुसंपादन घोटाळा, मुख्यमंत्री लाभार्थी; संजय राऊत यांचा आरोप

नाशिक महानगरपालिका हद्दीत 800 कोटींचा भुसंपादन घोटाळा, मुख्यमंत्री लाभार्थी; संजय राऊत यांचा आरोप

नगरविकास खात्याने नाशिक महानगरपालिका हद्दीत 800 कोटींचा भुसंपादन घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत हा आरोप केला आहे. या घोटाळ्याचा थेट फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांना झाल्याचे सांगत संजय राऊत यांनी येत्या दोन दिवसात या घोटाळ्याची माहिती देणार असल्याचे सांगितले.

मोदी यांच्या काळात भ्रष्ट्राचार हाच शिष्टाचार ठरतआहे. सध्याचे महाराष्ट्रातील मिंधे सरकार हेत्याचे ज्वलंत उदाहरण! नाशिक महाननगरपालिकाहद्दीत 800 कोटीचा भुसंपादन घोटाळा नगरविकास खात्याने केला असून मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे लोक या गैरव्यवहारातले थेट लाभार्थी आहेत. मी दोन दिवसांत यावर स्फोट करीन तो पर्यंत लाभार्थीनी शांत झोपावे. महाराष्ट्र कोण लुटतआहे? असा सवाल संजय राऊत यांनी या ट्विटमधून केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;