जो महिलांवर करेल अत्याचार त्यालाच तिकीट देईल मोदी सरकार, विजय वडेट्टीवार यांची टीका

जो महिलांवर करेल अत्याचार त्यालाच तिकीट देईल मोदी सरकार, विजय वडेट्टीवार यांची टीका

ऑलिम्पिक मेडल विजेता महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केलेल्या ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाला भाजपने तिकीट दिले आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप व नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. जो महिलांवर करेल अत्याचार त्यालाच तिकीट देईल मोदी सरकार, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत ही टीका केली आहे.

”ऑलिम्पिक मेडल विजेता महिला कुस्तीगीर खेळाडूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते आणि त्याबाबत अनेक पुरावे सुद्धा दिले होते. तरी सुद्धा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने बलात्काराचे आरोप असलेल्या ब्रिजभूषण सिंह यांचा मुलगा भूषण सिंह याला कैसरगंज मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले आणि महिला अत्याचार कसा कमी झाला याबाबत लांब लचक भाषण केलं त्याच उमेदवाराचा मुलगा प्रज्वल रेवेना याचे महिलांवर अत्याचार करतानाचे तीन हजार व्हिडिओ क्लिप्स समोर आले. त्यानंतर त्याला देशातून पळ काढण्यासाठी भाजपच्याच लोकांनी मदत केल्याची माहिती पुढे आली. अशा बलात्काराच्या आरोपींना पाठीशी घालून पुन्हा त्यांनाच तिकीट देणारा पक्ष आणि पंतप्रधान देशाला हवा का ? की महिलांसाठी लढणारा आणि त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करणारा पक्ष आणि पंतप्रधान हवा हा निर्णय घेणारी ही २०२४ ची लोकसभा निवडणूक आहे, अशी पोस्ट वडेट्टीवार यांनी शेअर केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;